भोकर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पाऊस धारा बरसल्या
भोकर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पाऊस धारा बरसल्या
************
विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी) मृग नक्षत्राच्या पाऊसधारा 10 जून रोजी बरसल्याने बळीराजा आनंदी झाला असून खरीपाच्या पेरण्याची लगबग सुरू झाली आहे.
जून महिना लागल्याने देखील प्रचंड ऊन जाणवत होते उकाडा देखील मोठ्या प्रमाणावर होता, सूर्य तळपत होता ढगाळ वातावरण दिसत असले तरी वातावरणात उकाडा होता,उन्हाळ्याप्रमाणे ऊन लागत होते, शेतकऱ्यांनी अशाही परिस्थितीमध्ये शेताची मशागत करून पेरणीसाठी जमीन तयार करून ठेवली, बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येऊ लागली, पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली,कधी पाऊस पडतो आणि पेरणी कधी सुरू होते असेच शेतकऱ्यांना वाटू लागले.
♦विजांच्या कडकडाटासह मृगधारा बरसल्या
***********
जून महिना असूनही उन्हाची तीव्रता जाणवत होती प्रचंड उकाडा देखील होता,अशातच 10 जून 2024 सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह भोकर तालुक्यात मृगधारा बरसल्या,तालुक्यात सगळीकडे पाऊस सुरू झाला,मृगाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या मानवी जीवाला दिलासा मिळाला,शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे काही शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत, मृग नक्षत्राच्या धारा बरसल्याने उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे वातावरणात बदल झाला असून थंड वाऱ्याची झुळूक येऊ लागली आहे, पावसाची सुरुवात झाल्याने सारेच आनंदी झाले आहेत