सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजना

भोकर तालुक्यात मुरमाचे अवैधरित्या उत्खनन: शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला

भोकर तालुक्यात मुरमाचे अवैधरित्या उत्खनन: शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला
*************


मुरूम खोदताना बेंबर – रिठा मार्गावरील 40 फुटाचा रस्ता ही टाकला खोदून: परिसरातील शेतकरी झाले हैराण
**************

भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यात गेली अनेक दिवसापासून अवैधरित्या मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर रात्री बे रात्री उत्खनन करून चोरीच्या मार्गाने वाहतूक केली जात आहे, रेतीचा देखील असाच प्रकार चालू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडविल्या जातो, 21 मार्च रोजी दुपारी बेंबर ते रिठा माळरानात असाच मुरूम खोदत असताना चक्क 40 फुटाचा रस्ताचा खोदून टाकण्यात आल्याने या मनमानी कारभारांबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
भोकर तालुक्यात मुरमाची व रेतीची चोरट्या मार्गाने रात्री बेरात्री वाहतूक करण्याचे प्रकार चालू आहेत यापूर्वी काही वेळा महसूल विभागाने वाहने पकडून कार्यवाही केली होती मात्र पुन्हा हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला मुरुमाचीअवैधरित्या चोरटी वाहतूक केली जाते उत्खनन केले जाते नाममात्र रॉयल्टी दाखवून मोठ्या प्रमाणावर मुरूम खोदून नेण्यात येत आहे उमरी व मुदखेड तालुक्यातुनअशाच प्रकारे रेती चोरट्या मार्गाने आणण्यात येते यामुळे शासनाचा महसूल मात्र मोठ्या प्रमाणावर बुडविल्या जात आहे.

बेंबर- रिठा मार्गावरील 40 फुटाचा रस्ता टाकला खोदून
************

भोकर तालुक्यात महसूल प्रशासनाची भीती नसल्यामुळे राजरोसपणे अवैधरित्या गुरुमाचे उत्खनन केल्या जाते, रेतीची चोरटी वाहतूक केली जाते 21 मार्च रोजी असाच प्रकार घडला असून बेंबर गावाजवळ माळरानात एका कंत्राटदाराकडून जेसीबी लावून मुरूम खोदण्यात आला मुरूम खोदत असताना चक्क 40 फुटाचा रस्ता देखील खोदून टाकला बेंबर रिठा जाणाऱ्या मार्गावरील रस्ता खोदून टाकल्यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले असून बेंबर व रिठा येथील चे सरपंच यांना शेतकऱ्यांनी ही बाब सांगितली त्यांनी तहसीलदार यांना याबाबतची माहिती दिली सदर कंत्राटदार कोण प्रशासन काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button