भारत देशातील नारी दुर्गा, अंबिका आहे- ह.भ.प. बालाजी महाराज गुडेवार यांचे प्रतिपादन

भारत देशातील नारी दुर्गा, अंबिका आहे – ह.भ.प. बालाजी महाराज गुडेवार यांचे प्रतिपादन **************************
भोकर मध्ये मार्कंडेय ऋषी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा
*******************
भोकर (तालुका प्रतिनिधी) भारतीय नारी केवळ स्त्री नसून आई आहे, जननी आहे, माता आहे या देशात नारींची पूजा केली जाते म्हणून भारत देशातील नारी दुर्गा अंबिका आहे असे विचार ह.भ.प. बालाजी महाराज गुडेवार यांनी भोकर येथील मार्कंडेय पुरान कथेत बोलताना मांडले.
येथील शास्त्रीनगर म्हैसा रोडवर बांधण्यात आलेल्या मार्कंडेय ऋषी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा निमित्त 24 ते 27 मार्च दरम्यान मार्कंडेय ऋषी पुराणकथा आयोजित करण्यात आली होती. 24 मार्च रोजी भजनाचा कार्यक्रम झाला 25 मार्च रोजी ह.भ.प.माधव महाराज येलूरकर यांचे कीर्तन झाले 26 मार्च रोजी सकाळी होम हवन पूजा विधी करून मार्कंडेय ऋषी मूर्ती स्थापना वेदशास्त्र संपन्न रवी गुरु जोशी यांच्या हस्ते करण्यात आली, तत्पूर्वी शहरातून मंगल कलश यात्रा काढण्यात आली होती त्यानंतर भोकर येथील कैलास गडाचे महंत उत्तमबन महाराज यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले मार्कंडेय पुराण कथेत बोलताना बालाजी महाराज गुडेवार म्हणाले आई-वडिलांना सामान्य समजू नका त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले पाहिजे, भारतीय भूमी पवित्र आहे नीती आणि नाती जपली पाहिजे, स्वार्थापोटी नाती जपू नका दुर्गा ही अष्टभुजा आहे, स्वभाव मधुर ठेवा जीवन मधुर होईल, सूर्य उपासना महत्वाची आहे, मार्कंडेय ऋषीच्या जन्मानंतर त्यांना केवळ पाच वर्षाचे आयुष्य होतं भगवान शिव प्रभूची आराधना केल्यानंतर त्यांनी मृत्यूवर मात करून अमर झाले म्हणून आज ते पूजनीय वंदनीय आहेत भोकर मध्ये स्थापन करण्यात आलेली मूर्ती अतिशय विशाल असून पद्मशाली समाज बांधवांनी दररोज मनोभावे पूजा करावी असेही शेवटी महाराज म्हणाले 27 मार्च रोजी काल्याचे किर्तन आणि सांगता झाली सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले