आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव

बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव
***********

भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर विधानसभा मतदारसंघात बहुजन नेते म्हणून ओळख असलेले नागनाथ घिसेवाड यांचा वाढदिवस 15 ऑगस्ट 2024 रोजी भोकर मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे सर्वसामान्य माणूस ते सर्वपक्षीय मान्यवर मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी मतदार संघातून मोठी गर्दी उसळली होती.
भोकर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणून नागनाथ घिसेवाड यांनी गेली 30 वर्षापासून अखंडपणे संघर्ष करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला सर्वसामान्य बहुजन जनतेच्या बळावर राजकीय सत्ताही हस्तगत केली विधानसभेसाठी मात्र अल्पशा मतांनी पराभव झाला तरी त्यांनी आपले बहुजन हिताचे कार्य चालूच ठेवले. 15 ऑगस्ट 2024 रोजी कै.लक्ष्मनराव घीसेवाड विद्यालयात वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,बंजारा समाजाचे नेते डॉ.उत्तम जाधव,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण भाऊ गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतीश देशमुख,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष आलेवाड,शंकर मुतकलवाड,खालेद मौलाना,जुनेद पटेल,दिलीप तिवारी आदींची उपस्थिती होती प्रारंभी कै.लक्ष्मणराव विद्यालय व हायस्कूलच्या वतीने शिक्षक विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला त्यानंतर झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये 61 किलोचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी घीसेवाड यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून येणाऱ्या भविष्यकाळात आपली राजकीय वाटचाल यशस्वी होईल असा शुभ संकेत दिला.

सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी- घीसेवाड
****************

भोकर विधानसभा मतदार संघात मागील 30 वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत राहून प्रस्थापितांच्या विरोधात आपण लढा दिला, बहुजन समाजाचे संघटन केले,वेगवेगळे गुन्हे दाखल करून अनेक षडयंत्र रचून मला संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तेच संपले मी मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे अजूनही खंबीरपणे उभा आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार सोबत घेऊन माझी वाटचाल अजूनही चालू आहे, सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहील असा ठाम विश्वास यावेळी बोलताना नागनाथ घीसेवाड यांनी व्यक्त केला

सत्तेचा माज चढलेल्या मंडळींना खाली खेचा- राम चौधरी
**************

भोकर विधानसभा मतदारसंघात गलिच्छ पद्धतीचे राजकारण झाले आहे,घराणेशाही,हुकूमशाही इथे चालू आहे घिसेवाड,आयलवाड, डॉ. जाधव व मी हे सारे “जखमी शेर”आहोत काही मंडळींना सत्तेचा माज चढलेला आहे भ्रष्टाचाराचे कुरण राजकारण झाले आहे त्यासाठी आता बहुजनांनी आपल्या विचारांच्या माणसांना सत्तेमध्ये पाठवा आणि सत्तेचा माज चढलेल्या मंडळींना खाली खेचा असे सांगून नागनाथ घीसेवाड यांना एक ना एक दिवस आमदार होण्याची संधी नक्कीच मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्तम पा.हसापूरकर बालाजी खर्डे पाटील,शंकरराव अंमदुरेकर,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष अलेवाड,पांडुरंग वर्षेवार,रामेश्वर गौड चंपतराव मेंडके पत्रकार एल.ए.हिरे,उत्तम बाबळे,मनोज गिमेकर,अहमद भाई करकेलीकर,सुभाष नाईक,सिद्धार्थ जाधव,सुनील हंकारे,आप्पाराव राठोड,दत्ता बोईनवाड,ज्योतीताई सरपाते,प्राचार्य गणेश जाधव व सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बी आर पांचाळ यांनी केले तर आभार नागोरावजी शेंडगे यांनी मानले शाळेतील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप ही यावेळी करण्यात आले सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button