Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासरकारी योजनासामाजिक कार्य
बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे सद्भावना दिन साजरा
बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे सद्भावना दिन साजरा
वसमत प्रतिनिधी : आज दिनांक 20 ऑगस्ट2024 रोजी बहिर्जी स्मारक महाविद्यालय,वसमत येथे सद्भावना दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार अँड मुंजाजीराव जाधव साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मा.जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एम.भोईवार,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्रीकांत गावंडे, ब्रह्मानंद शिंदे, डॉ. स्वाती पाटील मॅडम यांच्या सह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी मिळून सद्भावना शपथ घेऊन सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. त्या नंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली व परिसर स्वच्छ करण्यात आला.