सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

बजरंग दल व विश्व हिंदू परिषद तर्फे शौर्य पथ संचलन व धर्मसभा संपन्न…….

बजरंग दल व विश्व हिंदू परिषद तर्फे शौर्य पथ संचलन व धर्मसभा संपन्न…….

वसमत प्रतिनिधी.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा हिंगोली तर्फे दिनांक ९ मार्च रोजी वसमत येथे पथ संचलन व धर्मसभा कार्यक्रम संपन्न झाला. जनजागृती, देशभक्ती, समाज संघटन, हिंदू धर्म जागृती यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संपुर्ण वसमत शहरातील प्रमुख मार्गावरून बजरंग दल सदस्यांनी शिस्तीत पथ संचलन केले . संध्याकाळी जिल्हा परिषदेच्या मैदानावर धर्मसभा संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक , बजरंग दल सदस्य व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निरजजी दानोरिया, विवेकजी कुलकर्णी, महंत ज्ञानेश्वर भारती महाराज, पद्मनाभ गिरीजी महाराज, गणेश काळे, सिताराम म्यानेवार यांच्या सह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


पथ संचलनावेळी शहरातील विविध ठिकाणी नागरिकांतर्फे पुष्पवृष्टी द्वारे स्वागत करण्यात आले.
नागरिकांसोबत सिताराम म्यानेवार यांच्या चंद्रा या गोमातेनेही फेरीत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button