फुलांची उधळण करीत हत्तीबेटावर समर्थांच्या पालखीचे स्वागत
फुलांची उधळण करीत हत्तीबेटावर समर्थांच्या पालखीचे स्वागत
उदगीर- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राज्यभर परिक्रमा करीत निघालेल्या श्री स्वामी समर्थ पालखी चे हत्तीबेट गडावर व उदगीर येथे स्वामी समर्थ भक्तांनी फुलांची उधळण करीत भव्य स्वागत केले. राज्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे दर्शन स्वामी भक्तांना व्हावे या पालखी पादुकां परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.
१२जून रोजी ही पालखी अक्कलकोट ला पोहचणार आहे. शुक्रवारी ही पालखी लातूर,नळेगाव येथून हत्तीबेट गडावर आली. हत्तीबेट येथील स्वामी समर्थ मंदिरात पालखी परिक्रमेचे संयोजक सिद्धराम कल्याणी, पुजारी संजय कुलकर्णी व पालखी सेवेकाऱ्यांचा व्ही. एस. कुलकर्णी, रणजित बानापुरे, सचिन सूर्यवंशी,ज्योती बानापुरे, सुनंदा सरदार, गणेश चव्हाण, मनीषा केंद्रे यांनी शाल,श्रीफळ देवून सत्कार केला. हत्तीबेट परिसरातील भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. हत्तीबेटावरील स्वामी समर्थ मंदिरात आरती व प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही पालखी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थांचा गजर करीत उदगीरकडे रवाना झाली. उदगीर येथे या पालखीचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, विजय निटूरे, सुभाष नागठाणे, संतोष तोडकर, महावीर पाटील, अविनाश हेरकर, ज्ञानेश्वर बिरादार, अजय निटूरे, प्रभुराज कप्पीकेरे, राजकुमार हुडगे, गुंडप्पा समगे, धूळप्पा सोलापुरे,शिवकुमार उप्परबावडे ,राम मोतीपवळे यांनी स्वागत केले. उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही पालखी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या निवासस्थानी विसावली.शनिवारी सकाळी संतोष तोडकर यांच्या हस्ते आरती व पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर ही पालखी देवणी, निलंगा मार्गे अक्कलकोट कडे प्रस्थान झाली .