फिर्यादीच निघाला देशी दारू चोरणारा चोर…
फिर्यादीच निघाला देशी दारू चोरणारा चोर…
————–
नेवासा प्रतिनिधी – पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक. ०७/०६/२०२४/रोजी रात्री १०.००.वा. ते दिनांक ०८/०६/२०२४/ रोजी सकाळी ०७.००.वा. च्या दरम्यान नेवासा पोलीस स्टेशन हददीत नेवासा खुर्द ता.नेवासा.जि.अहमदनगर येथील चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्या सरकारमान्य देशी दारु दुकानाच्या पाठीमागील बाजुचे शटरचे लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करुन एकूण ७१,०००/- रु किंमतीच्या देशी भिंगरी संत्रा व बॉबी दारुचे २३ बॉक्स चोरी केले.याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ५५९/२०२४ भा.द.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिली.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी तात्काळ पो.हे.कॉ.आर.एम.केदार, पो.कॉ. आप्पा तांबे, पोकॉ.जी.ए.फाटक यांचे पथक तयार करुन पुढील तपास चालु केला असता गोपणीय बातमीव्दारामार्फत बातमी मिळाली की, चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्याच मालकीचे कुकाणा गावातील सरकारमान्य देशी दुकानात कामाला असलेला (कामगार) बलराज राजेश्वर बिमागणी यानेच चोरी केल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक हे कुकाणा येथील चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या देशी दारुच्या दुकानात जावुन तेथील कामगार बलराज बिमागणी यास विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, दिनांक. ०८/०६/२०२४/ रोजी रात्री १२.३० ते ०१.०० वा.चे सुमारास नेवासा खु येथील माझा मित्र काणकराजु पोचायीह गोपारी (नेवासा खु) येथील देशी दारुच्या दुकानाचा मॅनेजर, या गुन्हयातील फिर्यादी याच्याकडुन दुकानाच्या डुप्लीकेट चाव्या घेवुन दुकानाचे शटर खोलुन दुकानातील देशी भिंगरी व बॉबी देशी दारुचे बॉक्स माझा मित्र निलेश देशमुख रा.कुकाणा याच्या टाटा जीप गाडीमध्ये चोरुन नेवुन माका येथील एका पत्राचे शेडमध्ये ठेवलेले आहे.त्यांनतर तात्काळ पोलीस पथक व आरोपी बलराज राजेश्वर बिमागणी यास दोन पंचासमक्ष सोबत घेवून माका येथील आरोपीने दाखविलेल्या पत्राचे शेडमध्ये सरकारी वाहनाने जावुन खात्री केला असता सदर पत्राचे शेड मध्ये १६ देशी दारुचे एकुण १६ बॉक्स ५०,२००/- रु.किमतीचे दोन पंचासमक्ष पंचनाम्याने हस्तगत करुन त्यावर पोलीस व पंचाचे सही लेबल लावून जागीच जप्त केले. या गुन्हयांत वापरलेले १,५०,०००/- रु किंमतीचे चार चाकी मालवाहु वाहन असा एकूण २,००,२००/-रु.किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
सदर गुन्हयांच्या तपासामध्ये सदर गुन्हयातील फिर्यादी काणकराजु पोचायीह गोपारी व आरोपी बलराज राजेश्वर बिमागणी या दोघांनी संगनमत करुन गुन्हा केल्याने त्यांना दिनांक ०९/०६/२०२४/रोजी रात्री १०.००.वा. अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीनां दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव, पो.हे.कॉ राजेंद्र केदार, पो.कॉ.आप्पा तांबे, पो.कॉ.गणेश फाटक, पो.कॉ.अवि वैदय, पो.कॉ.अमोल कर्डिले यांनी केली.सदर गुन्हांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र केदार हे करत आहे.