पावसामुळे नांदेड येथील शिव महापुराण कथा दोन दिवस स्थगित
पावसामुळे नांदेड येथील शिव महापुराण कथा दोन दिवस स्थगित
***********
ऑनलाइन कथा ऐकण्याचे आवाहन
************
पावसामुळे मंडपात साचले पाणी
***********
नांदेड (बी.आर.पांचाळ) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा नांदेड येथे 23 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाली मात्र पहिल्याच कथेच्या दिवशी रात्री नांदेड शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पूर्ण मंडप पाणी व चिखलाने भरून गेला, रात्री मंडपामध्ये थांबलेल्या भाविक भक्त महिलांची अचानक झालेल्या पावसाने एकच तारांबळ उडाली समितीने तात्काळ दक्षता घेऊन महिलांना इतरत्र मंगल कार्यालयात हलविले.
नांदेड येथील कौठा भागात भव्य अशा मंडपात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांची शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती कथेच्या पहिल्याच दिवशी 23 ऑगस्ट रोजी लाखोंची गर्दी जमली होती कथा संपताच सायंकाळी 4वाजता पाऊस सुरू झाल्याने बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय झाली रात्री मंडपामध्येच जवळपास 10 हजार भक्त महिला व भाविक थांबलेले होते रात्री 8 वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने पूर्ण मंडप पाण्याने भरून गेला चिखल देखील साचला अचानक पाऊस झाल्याने पूर्ण मंडपात पाणी शिरले यामुळे महिला व भाविक घाबरून गेल्या होत्या सर्वांची एकच तारांबळ उडाली झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत समितीच्या वतीने सर्व महिलांना व भाविकांना तात्काळ मंगल कार्यालयात हलविण्यात आले
2 दिवस कथा स्थगित ऑनलाइन कथा ऐकण्याचे आवाहन
————
नांदेड मध्ये झालेल्या पावसामुळे मंडपामध्ये पाणी साचून चिखल झाला आहे त्यामुळे 24 व 25 ऑगस्ट रोजी कथा स्थगित करण्यात आली आहे कथा ऐकण्यासाठी मंडपाच्या स्थळी भाविकांनी येऊ नये ऑनलाईन कथा ऐकावी असे आवाहन कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत संयोजक शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार यांनी केले आहे मंडपाच्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कथेची पुढील सूचना कळविण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे