पत्रकार बी. आर. पांचाळ राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित
पत्रकार बी. आर. पांचाळ राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित
***********
नाशिक येथे शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान
**********
भोकर( तालुका प्रतिनिधी) लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणारे भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने नाशिक येथे एका भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक व विकासात्मक पत्रकारिता करून सर्वसामान्यांना न्याय देणारे भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना यापूर्वी विविध संस्थांचे, शासनाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, ग्रामीण भागातील विविध विकासाचे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या समस्या ते आपल्या लेखणीतून सातत्याने मांडत असतात त्यांच्या या विकासात्मक व सामाजिक लेखनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला 5 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार देऊन बी. आर. पांचाळ यांना एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोज शिंदे (सुरत ) झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार, म.वि.प्र.चे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, गुणवंत कामगार मंडळाच्या अध्यक्षा सौ.भारती चव्हाण, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत, राजस कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपाशी, मंत्राज ग्रीन रिसर्चचे डॉ. यु.के. शर्मा, मीशेष मलेशिया इंटरनॅशनल मॉडेल सौ. ज्योती केदारे- शिंदे, भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, छंद दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार,उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, बी.जे. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र स्मृतीचित्र देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत