आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ता

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता परभणी जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता परभणी; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

मानवत प्रतिनिधी
चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरून पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या तालुक्यातील उक्कलगाव येथील एका ४७ वर्षीय पतीची परभणी सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली .
याबाबत माहिती अशी की , तालुक्यातील उक्कलगाव येथील तुकाराम बाबाराव पिंपळे याच्यावर त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा आरोप होता . या खून प्रकरणी ३० जानेवारी २० मध्ये येथील पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता . सदरील गुन्ह्यात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून तपास करीत जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते . या प्रकरणात ७ साक्षीदार तपासण्यात आले . परंतु सरकार पक्ष आरोपीविरुद्ध सबळ पुरावा सिद्ध न करू शकल्याने सत्रन्यायाधीश एस एस नायर यांनी तुकाराम पिंपळे यांची निर्दोष मुक्तता केली .
आरोपीच्या वतीने ऍड भारत चिलवंत यांनी बाजू मांडली . त्यांना ऍड अर्चना देशमुख , ऍड रमाकांत शिंदे , ऍड सखाराम देवकते यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button