न्यू इंग्लिश स्कूल तुंग तालुका मिरज या विद्यालयांमध्ये आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
न्यू इंग्लिश स्कूल तुंग तालुका मिरज या विद्यालयांमध्ये आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणित विषयाचे जेष्ठ शिक्षक मोहन बंडगरसर तर अध्यक्ष हिंदी विषयाचे जेष्ठ शिक्षिका रोहिणी सावंत मॅडम होत्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री भगवान बोतेसर सुरेश सायमोते, शशिकांत पवार विजय हाबळे, दीपक देसाई, अभिजीत सरदेशमुख,सिमरन इनामदार मनिषा कोळेकर आसीफ देवळे उपस्थित होते प्रमुख पाहुणे बंडगर सर म्हणाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण विश्वाला आदर्शदायी आहे विद्यार्थी मित्रहो तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करून चांगले नागरिक व्हावे असे ते म्हणाले अध्यक्ष भाषणात सावंत मॅडम म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजाची कार्याची पद्धत सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी महिलांना आदराचे स्थान दिले. शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य मध्ये केले आज शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे होतात असा आदर्श राजा आपणामध्ये होऊन गेला. याचा अभिमान आपणा सर्वांना आहे याप्रसंगी विजय हाबळे सुरेश सायमोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार मनीषा कोळेकर मॅडम यांनी मानले.