नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सौ.कोमल आरगडे यांची निवड.
नेवासा- तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सौ.कोमल आरगडे यांची निवड.
नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या सौंदाळा ग्रामपंचायतचे उपसरपंचपदी सौ.कोमल पंकज आरगडे यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच असलेले गणेश अरुण आरगडे यांनी ठरल्याप्रमाणे रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती.
लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत सदस्य जिजाबाई बोधक यांनी सूचना केली व अनुमोदन इंदुबाई ज्ञानदेव आरगडे यांनी अनुमोदन दिल्याने सौ.कोमल पंकज आरगडे यांची बिनविरोध निवड झाली.
सौंदाळा ग्रामपंचायत माध्यमातून विकास कामात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ.कोमल आरगडे यांनी सांगितले.
यावेळी भिवसेन गरड, हरिभाऊ आरगडे, बाळासाहेब आरगडे, मच्छिन्द्र आरगडे, सचिन आरगडे, मधुकर आरगडे, उत्तमराव आरगडे, लक्ष्मण चामुटे, दत्तात्रय आरगडे, भिमराव आढागळे, वसंत बोधक, हरी बोधक, मंजु आढागळे, लक्ष्मण आरगडे, हनुमान आरगडे, संभाजी आरगडे, बापूसाहेब आरगडे, अशोक आरगडे, संजय आरगडे आदीसह मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
मा.जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख व मा.आ.चंद्रशेखर घुले व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांनी सौ.कोमल आरगडे यांचे अभिनंदन केले आहे.