नांदेड येथील शिवमहापुराण कथेला भाविकांची अलोट गर्दी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळ वाणीतून कथेला प्रारंभ
नांदेड येथील शिवमहापुराण कथेला भाविकांची अलोट गर्दी
**********
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळ वाणीतून कथेला प्रारंभ
***********
नांदेड ( बी. आर. पांचाळ) : हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात नांदेडमध्ये महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून शिव महापुराण कथा प्रारंभ झाला मानवी जीवनाचे कल्याण करणारी शिवकथा असून श्रद्धेने भक्ति केल्यास तो प्रत्येकाच्या संकटात धावून येतो मानव जन्म बहुत कष्टाने मिळाला असून त्यास व्यर्थ गमावू नका जिथे शिव नाही असे भूमी नाही नांदेड हे पवित्र ठिकाण असून गोदावरी नदीच्या तीरावर कथा होत आहे हे नांदेडकरांच भाग्य आहे असेही पंडित मिश्राजी म्हणाले यावेळी प्रस्ताविका भाषण करताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले पंडित मिश्रा यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी दुरदुरुन भक्तगण नांदेड मुक्कामी आले आहेत.
या सर्व भक्तांचे नांदेडकरांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. या मोदी मैदानावर अनेक विराट सभा झाल्या आहेत पण या सर्व सभापेक्षा वेगळी भक्तीच्या शक्तीची अलोट गर्दी इथे पहायला मिळते आहे. पवित्र श्रावण महिन्यात मिश्राजींच्या सुमधूर वाणीतून आपल्याला महाशिवपूराण कथा ऐकायला मिळणे, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी इथे लाखोंचा जनसमुदाय जमला आहे. प्रलयाच्या वेळी महादेवच तारणहार असणार, हा भक्तांचा विश्वास असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात शिवलिंगाची आवर्जून पूजा होते, असे खा. चव्हाण पुढे म्हणाले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिवपुराणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्वाचे धार्मिक कार्य पं. प्रदीप मिश्रा यांनी केले आहे. या शिवमहापुराण कथेचे संयोजक शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांच्यामुळे नांदेडकरांसाठी हा योग जुळून आल्याचे सांगत खासदार चव्हाण यांनी या दोन्ही कुटुंबियांचे विशेष आभार मानले. दरम्यान, अफाट लोकप्रियतेचे धनी असलेले पंडित मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेच्या श्रवणासाठी नांदेडमध्ये लाखोंचा जनसमुदाय उसळला आहे.