नगरपालिकेने रात्री उशिरापर्यंत तुंबलेले शहर केले पाणी मुक्त
नगरपालिकेने रात्री उशिरापर्यंत तुंबलेले शहर केले पाणी मुक्त
मानवत प्रतिनिधी – १० जून रोजी मानवत शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला या पावसाने शहारत विविध ठिकाणी पाणी तुंबल्याने पाणीच पाणी अशी परिस्थिती उद्भवली होती पाऊसाचे प्रमाण कमी होताच मुख्यधिकारी कोमल सावरे यांनी पाणी काढण्याची मोहीम हाती घेत रात्री उशिरापर्यंत तुंबलेले शहर पाणी मुक्त केले.
नगरपालिकेने नुकतेच नालेसफाई सुरळीतपणे करून देखील पाणी शहरातील काही वसाहतीमध्ये तर काही ठिकाणी व्यापारी संकुलात घुसले होते .यासाठी नगरपालिकेने सामूहिक रित्या सर्व यंत्रणा कामाला लावून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सर्व पाणी काढून देण्यात यश मिळवले. १० जून रोजी मानवत शहरात फार मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ढगफुटी सदृश्य असल्याचे लोकांमधून बोलले जात होते. हा पाऊस पडल्यानंतर मानवत शहरातील देवी मंदिर रोड परिसरात असलेला नाला ओसंडून वाहत होता. परिणामी नाल्याच्या बाजूस असलेल्या व्यापारी संकुलासह बांगड टॉकीज रोड वर असलेल्या गुणांच्या शटर पर्यत पाणी आल्याने दुकानदार दुकानात पाणी शिरते कि काय या विंचनेत होते . त्यानंतर जिजाऊ नगर परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या वर आणि पाण्याचा प्रवाह खाली अशी परिस्थिती असल्याने संपूर्ण जिजाऊ नगर मध्ये पाणी घुसले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळाच्या पाठीमागे असलेली नाली लहान आणि पाण्याचा प्रवाह मोठा यामुळे देखील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये पाणी घुसले त्याचबरोबर बस स्थानकाच्या बाजूला असलेले छोटे मोठे दुकानदार यांच्या दुकानात देखील पाणी घुसले. हे सर्व पाणी काढून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन व नागरीक यांनी सामूहिकरीत्या काम करीत पाणी काढून देण्यावर यश मिळवले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोमल सावरे व स्वच्छता निरीक्षक मुंजा गवारे यांनी जेसीबीसह स्वच्छता विभागाचे संपूर्ण कर्मचारी घेऊन ठिकठिकाणी कोंडलेले नाले मोकळे करीत पाणी काढून देण्यासाठी परिश्रम घेतले.
नागरिकंनी नाल्या तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी – कोमल सावरे
१० जून रोजीच्या पहिल्याच पावसात शहरात काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.हे पाणी साचण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागरिकांकडून अनावधानाने नाल्या तुंबणारे साहित्य नाल्यामध्ये टाकण्यात आले होते. यामुळे नाल्या तुंबल्या आणि पाणी रस्त्यावरून सरळ वसाहतीमध्ये घुसले काही ठिकाणी व्यापारी संकुलात देखील घुसले असा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी शहरात असलेल्या नाल्या तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी मानवत वासियांना केले.