आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासरकारी योजनासामाजिक कार्य

दुर्गा नवरात्र उत्सव शांततेत पार पाडा – पो.नि.अजित कुंभार

दुर्गा नवरात्र उत्सव शांततेत पार पाडा- पो.नि.अजित कुंभार
****************

भोकर( तालुका प्रतिनिधी )

भोकर शहरामध्ये सर्व सण उत्सव शांततेत पार पाडले जातात,शहराची चांगली परंपरा आहे,येणारा दुर्गा नवरात्र उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले
भोकर येथे पंचायत समिती सभागृहात पोलीस स्टेशनच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्यधिकारी वृषभ पवार हे होते प्रारंभी प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दुर्गा मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊन मंडळ स्थापन करावे,गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी,विजेचे कनेक्शन देखील नियमानुसार घ्यावे ,मिरवणुकीत डीजे वापरता येणार नाही,अनाधिकृत कृत्य होणार नाही याचीही काळजी घ्यावी, त्याबरोबरच शासनाच्या नियमांचे देखील पालन करावे,इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी शांततामय वातावरणात उत्सव पार पडला पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत मांडले,भोकर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली,अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे,शहरामध्ये स्वच्छता असावी,मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून घ्यावेत,शहरात होणारा विजेचा लपंडाव थांबायला पाहिजे अशा सूचना पत्रकार एल.ए. हिरे , बी.आर.पांचाळ,उत्तम बाबळे,मनोज गीमेकर ,बालाजी नारलेवाड शमीम इनामदार,मिलिंद गायकवाड,आनंदाबाई चुनगुरवाड यांनी मांडल्या तर ग्रामीण भागात अवैधरित्या देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते त्यावर पाय बंद व्हावा अशी सूचना कांडलीचे सरपंच कामाजी पेनलोड यांनी मांडली नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी सुधारल्या जातील स्वच्छता करण्यात येईल अतिक्रमण व वाहतुकीबाबत देखील प्रयत्न राहतील असे मनोगत मुख्याधिकारी वृषभ पवार यांनी मांडले महावितरण चे उपअभियंता आचार्य यांनी विजेच्या समस्या येणार नाहीत याबाबत काळजी घेऊ असे आश्वासन दिले आगार प्रमुख काकडे अभियंता कोल्हेवाड यांच्या सह सर्व सदस्य पत्रकार बैठकीस उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार पो.उ.नि.सुरेश जाधव यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button