दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा व्हावा जागर
दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा व्हावा जागर
*************
महिलांवर होणारे अत्याचार, बचत गटाची चळवळ,महिला संघटन, शिक्षणाचेमहत्त्व,आर्थिक उन्नती जीवनाचे व्हावे सामाजिक प्रबोधन
************
भोकर( बी.आर.पांचाळ)
**************
भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,अनेक सण उत्सवामधून सामाजिक एकता जपली जाते ,भारतीय परंपरेची विविध रूपे उत्सवाच्या माध्यमातून दिसून येतात,गणेश उत्सवानंतर येणारा महिलांसाठी महत्त्वाचा असणारा उत्सव म्हणजे दुर्गा नवरात्र महोत्सव या उत्सवांमधून अनेक चांगले उपक्रम राबविले गेले पाहिजे महिलांच्या सशक्तीकरणासाठी या उत्सवांमधून मोठे सामाजिक प्रबोधन करणे गरजेचे आहे ,आजच्या दुर्गा उत्सव समितीकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जनजागृती,सामाजिक एकता,नारी शक्तीचा जागर, गृह उद्योगाची माहिती,आर्थिक उन्नती, मुलींचे शिक्षण अशा विविध अंगाने उत्सव साजरा झाला तर खऱ्या अर्थाने हा उत्सव महिला सक्षमीकरणाचा जागर होऊ शकतो
दुर्गा उत्सव म्हणजे शक्तीची उपासना आहे भारतीय संस्कृतीमध्ये नारी पूजनीय आहे,दुर्गा देवीचे रूप म्हणजे शक्तीची देवता आहे,वाईट विचारांचा नाश करून सत्याचा विजय, राक्षसी वृत्तीच्या लोकांचा आजही संहार करणे खरी गरज आहे,समाजा मध्ये वाईट विचार मोठ्या प्रमाणात रुजत आहेत,आजचे युवक व्यसनाधीन झालेले आहेत,महिलावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे,यासाठी आता महिला सक्षम बनल्या पाहिजे ,महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी शिक्षण घेऊन उच्चपदावर भरारी घ्यावी.ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव आहे,कमी वयामध्ये मुलींचे लग्न करून टाकल्या जाते,तिच्या भावी आयुष्याचा कधी विचार केला जात नाही हा विचार बदलून मुलींचे शिक्षण पूर्ण करा तिला तिच्या पायावर उभा राहण्याची शक्ती निर्माण करा हा संदेश जनमानसात रुजण्याची गरज आहे
दुर्गा उत्सवामधून व्हावा नारीशक्तीचा जागर
**************
दुर्गा उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे,10 दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते,शक्तीची उपासना केली जाते ग्रामीण व शहरी भागात दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मात्र देवीची मूर्ती बसवणे,आरती करणे ,गाणे वाजवणे आणि दांडिया खेळणे एवढ्या पुरताच हा उत्सव मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थाने या उत्सवांमधून नारी शक्तीचा जागर झाला पाहिजे आजकाल महिलावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे म्हणून महिलांच्या सशक्तिकरणाविषयी व्याख्यान आयोजित करावे,महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात,मुलींसाठी वक्रत्व स्पर्धा, यूपीएससी,एमपीएससी या विषयी मार्गदर्शन ,महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, राष्ट्रपुरुषांच्या विचारांची जोपासना,भारतीय नारींचा इतिहास,भारतीय अन्नपदार्थ बनविण्याची स्पर्धा,शृंगार स्पर्धा,गायन स्पर्धा सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान,नोकरी करून घर संसार सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान अशा विविध उपक्रमाने 10दिवस दुर्गा उत्सव साजरा झाला तर खऱ्या अर्थाने हा उत्सव नारी शक्तीचा जागर होऊ शकतो, धार्मिक परंपरे बरोबरच हा उत्सव सामाजिक प्रबोधनाचे माध्यम बनला पाहिजे , महिलांची संघटन शक्ती एकवटली पाहिजे, सर्व महिलांनी एकत्रित येऊन हा उत्सव खऱ्या अर्थाने महिलांमध्ये जागृती करणारा ठरला पाहिजे अशा विविध रूपांनी हा उत्सव साजरा झाला तर नक्कीच सामाजिक प्रबोधन होऊ शकते महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते