दानपेटी फोडणारा आरोपी चार तासात केला जेरबंद…
नेवासा पोलीसांची धडाकेबाज कारवाई…
दानपेटी फोडणारा आरोपी चार तासात केला जेरबंद…
नेवासा प्रतिनिधी – संतोष हिरामण कुंढारे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४/६/२४/रोजी रात्री ०९.३०वा. मी घरी असताना मला मंदीराचा साफसफाई करणारा दत्ता लष्करे रा.नेवासा याचा फोन आला की, काशीविश्वेश्वर मंदीरात चोरी झालेली आहे असा फोन आल्याने मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नरसु लष्करे, सचिव ॲड.संजीव शिंदे, विश्वस्त लक्ष्मण देशपांडे, साफसफाईचे काम करणारे सचिन गरुटे, कमलेश लघुरे यांचे सोबत मंदीरात जावुन पाहिले असता मंदीराचे मुख्य गाभा-यातील दानपेटीचे लॉक तोडुन त्यातील रक्कम, तसेच मंदीराचे आवारातील शनिदेव व मारुती यांचे चौथाऱ्या समोरील दोन दानपेट्या यांचे लॉक तोडुन त्यातील रक्कम चोरी गेल्याचे आमचे निदर्शनास आले.त्यावेळी आम्ही मंदीरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दिनांक २३/६/२४/ रोजी रात्री ११.००.वा. ते रात्री ११.४५.वा. च्या दरम्यान एका इसमाने मंदीराच्या भिंतीवरुन उडी मारुन आत प्रवेश करुन काशिविश्वेश्वर मंदीराचे गाभा-यातील दानपेटीचे लॉक तोडुन त्यातील रोख रक्कम चोरुन नेली.तसेच मंदीराचे आवारातील शनिदेव व मारुती याचे चौथाऱ्या यासमोरील दोन दानपेट्या फोडुन त्यातील रोख रक्कम चोर चोरुन नेत असल्याचे आम्हाला सीसीटीव्ही मध्ये दिसले.
तरी दिनांक २३/६/२४/ रोजी रात्री ११.००.वा.ते रात्री ११.४५.वा.. च्या दरम्यान काशीविश्वेशार मंदीर गाभा-यातील व आवारातील एकुण कुलुप बंद असलेल्या तीन दानपेट्याचे कुलुप एका अनोळखी इसमाने मंदीराच्या भिंतीवरुन आत उडी मारुन दानपेट्याचे कुलुप कटावणीचे सहायाने तोडुन त्यातील रोख रक्कम अंदाजे ८,०००/- ते १०,०००/-रुपये चोरून नेले आहे. या अज्ञात चोराविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे भां.द.वि. कलम ४५७, ३८०, ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रविण कुसळकर, पो.हे.कॉ.राजेंद्र केदार, पो.ना.शहाजी आंधळे, पो.कॉ.गणेश फाटक अशा अंमलदारांचे पथक तयार करुन आरोपीचे शोधाकरीता रवाना केले. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे मंदिरातील दानपेटीतील पैशांची चोरी करत असताना महेश अशोक गोंजारी रा.नेवासा बुद्रूक हा दिसला.त्यावरुन पथक लगेच सदर आरोपीच्या शोधा करीता त्याचे राहते गावामध्ये गेले असता, तो त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे समक्ष हजर केले असता त्याने सांगितले की, काशीविश्वेश्वर मंदीरामधील दानपेट्यातील पैशांची चोरी मीच केली आहे अशी त्याने कबुली दिली आहे.तरी आरोपी महेश अशोक गोंजारी यास सदर गुन्ह्यांत अटक करुन पुढील तपास हे पो.ना.शहाजी आंधळे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन नेवासा गु.र.नं ४०४/२०२० भा.दं.वि कलम ३५४ (ड), ३७६ (२) (j) (१) (n) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच यापुर्वी सुध्दा नेवासा खुर्द शहरामधील मळगंगा देवी मंदीरातील दान पेट्यातील पैसे चोरी करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच.नेवासा पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीम.वैभव कलुबर्म श्रीरामपुर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ.प्रविण कुसळकर, पो.हे.कॉ.राजेंद्र केदार, पो.ना.शहाजी आंधळे, पो.कॉ.गणेश फाटक यांनी केली.