तालुक्यातील पिचडगाव येथील मुक्ताई बारव पुनरुज्जीवन व वारसा संवर्धन कामाचा शुभारंभ…
तालुक्यातील पिचडगाव येथील मुक्ताई बारव पुनरुज्जीवन व वारसा संवर्धन कामाचा शुभारंभ…
नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प अंतर्गत सेवा वर्धिनी संस्था पुणे यांच्यामार्फत पिचडगाव येथे मुक्ताई बारव पुनरुज्जीवन व वारसा संवर्धन कामाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमास नेवासा तालुक्याचे युवा नेते मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख, पंचायत समितीचे मा.सभापती रावसाहेब कांगुणे, ह.भ.प.ज्ञानेश्वर(माऊली) महाराज हजारे, मिलिंद वैद्य, अरुणचंद्र पाठक, प्रमोद काळे, सदस्य महाराष्ट्र बारव संवर्धन समिती पराग सादगीर, कार्याध्यक्ष सेवावर्धिनी पुणे सुहास लुंकड,निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग सुरेश शिंदे, कार्यवाहक सेवावर्धिनी पुणे सोमदत्त पटवर्धन मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बारव विषयी माहिती सांगत असताना अरुणचंद्र पाठक यांनी सांगितले की पिचडगाव गावातील बारव अतिप्राचीन बारव आहे ज्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई नेवासाला जात असताना या बारावीचे पाणी मुक्ताई ने पिले होते.त्यामुळे या बारावचे पाणी शुद्ध झाले अशी महाराष्ट्रातील बारव पुस्तिका मध्ये याचा उल्लेख आढळतो असे त्यांनी सांगितले आहे. बारवचे पुनर्जीवन सेवावर्धिनी पुणे या संस्थेमार्फत पूर्ण करून असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमास पिचडगाव चे सरपंच पोपटराव हजारे, उपसरपंच संदीप गव्हाणे, चेअरमन भगवानराव शेजुळ, व्हा.चेअरमन उत्तम डिवरे, ग्रा.सदस्य जगदीश शेजुळ, सोसायटी संचालक श्रीकांत बनसोडे, हरिभाऊ बोरुडे, विठ्ठल शेजुळ, भाऊसाहेब शेजुळ, कचरू अप्पा हजारे, सोमनाथ हजारे, चांगदेव हजारे, शिवाजी ब्राम्हणे, शिवाजीराव शेजुळ, अण्णासाहेब औताडे, अंबादास गव्हाणे, किशोर हजारे, पोपटराव डिवरे, दत्तात्रेय हजारे, रखमाजी गायकवाड, उत्तमराव बनसोडे, शिवाजी पवार, साहेबराव गव्हाणे, योगेश हजारे, राजेंद्र गिर्हे, नारायण टिळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.