आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ता

तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथे १६ दिवशीय मृदुंग बालसंस्कार शिबिराची काल्याच्या किर्तनाने सांगता…

तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथे १६ दिवशीय मृदुंग बालसंस्कार शिबिराची काल्याच्या किर्तनाने सांगता…

धर्म व संस्कृती टिकण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार होणे ही काळाची गरज-ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री…

नेवासा प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुख्मिणी अध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्णाश्रमात सुरू असलेल्या १६ दिवशीय मृदुंग बालसंस्कार शिबिराची रविवारी दि.९ जून रोजी आश्रमाचे प्रमुख महंत वेदमूर्ती ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री
यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.धर्म व संस्कृती टिकण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी यावेळी बोलताना केले.
श्री विठ्ठल रुख्मिणी अध्यात्मिक केंद्र गोणेगाव चौफुला व  आळंदी येथील रामकृष्ण मृदुंगाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. रामकृष्णाश्रम आश्रमाचे संस्थापक ब्रम्हलिन गुरुवर्य ह.भ.प.रामकृष्ण काळे गुरुजी यांच्या २४ व्या पुण्यतिथी च्या निमित्ताने ब्रम्हलिन गुरुवर्य ह.भ.प.बन्सीमहाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य ह.भ.प.पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने या शिबिराची सांगता रविवारी करण्यात आली.पुण्यतिथीच्या निमित्ताने ब्रम्हलिन हभप काळे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन पुष्पांजली अर्पण करून
करण्यात आले.
यावेळी झालेल्या कीर्तनात बोलतांना ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री म्हणाले की रामकृष्ण काळे गुरुजींनी आश्रमामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत, तुकाराम गाथा पारायण, गोणेगाव आश्रम ते आळंदी देवाची कार्तिक वारी दिंडी सोहळा सूरु केला.आश्रमात ते नित्यनेमाची सेवा करत पहाटे काकडा व सायंकाळी हरिपाठ करत म्हणून ते हाडाचे वारकरी होते. नामचिंतन करतांनाचा गुरुजींनी आपला देह ठेवला असे सांगून त्यांनी आदरांजली वाहिली.
सोळा दिवशीय बाल संस्कार शिबिरात मुलांना श्री गीता, संत चरित्रे, ध्यान, नीतिमूल्ये, नामस्मरण, सुभाषिते, खेळ, व्यायाम, कथाकथन, मृदुंग, शस्त्र परिचय, प्रार्थना, वीरांचा इतिहास, मोबाईल आत्मघात, योगासने, विनोद नकला, युगपरिचय, व्याख्याने, वारकरी चाली, हरिपाठ, भूतदया आदी विषयावर प्रबोधन प्रशिक्षण देण्यात आले यामुळे भावी पिढीला निश्चितच भविष्यकाळ उज्वल असल्याचे सांगून असे संस्कार मुलांवर आईवडिलांना करणे गरजेचे असून संत जगाला सुपंथ दाखवून सत स्वरूप भगवान परमात्म्याची भेट करून देतात म्हणून संतांच्या संगतीत राहून परमार्थ करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
कीर्तनानंतर शिबिरात अन्नदानासह आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचा श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी आळंदी येथील मृदंग सम्राट ह.भ.प.सुखद महाराज जाधव व त्यांचे विद्यार्थी असे सुंदर सोलो वादनही झाले.असा आनंददायी क्षण उपस्थित  सर्व भाविक भक्तांना प्राप्त झाला उपस्थित भाविकांनी सोलो वादन प्रसंगी टाळयांची दाद देत प्रशिक्षणार्थी बाल वारकऱ्यांचे कौतुक केले.
काल्याच्या किर्तन प्रसंगी आळंदी येथील सीताराम महाराज मगर,महंत बाळकृष्ण महाराज दिघे, शेषराव महाराज जगताप, नामदेव महाराज कंक, भगवान महाराज चोळके शास्त्री, गहिनीनाथ महाराज आढाव, शिबीर नेतृत्व करणारे ह.भ.प.निलेश महाराज रोडे, शिबिर प्रशिक्षक आळंदी येथील मृदुंग अलंकार ह.भ.प.सुखद महाराज जाधव, हरि महाराज पवार शास्त्री, गायनाचार्य सचिन महाराज पवार, श्रीहरि महाराज वाकचौरे, हरि महाराज भोगे, आकाश महाराज गिरी, विठ्ठल महाराज गर्कळ, राम महाराज बोचरे, शुभम महाराज कापसे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, विठ्ठल महाराज वाकोडे, ओंकार महाराज किरमे, चंद्रकांत महाराज उढान, बदाम महाराज पठाडे, भारत महाराज गि-हे, संतसेवक विष्णूपंत ठोसर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button