सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा

तायक्वोंदोमध्ये लखलखीत यश! श्रेयश जगळपुरे ह्याला 9वा क्यूब (यलो बेल्ट) बहाल

तायक्वोंदोमध्ये लखलखीत यश!
श्रेयश जगळपुरे ह्याला 9वा क्यूब (यलो बेल्ट) बहाल

नांदेड | — प्रतिनिधी, एकमुख न्यूज | www.ekmukh.com

तालुक्यातील श्रेयश विष्णू जगळपूरे या अवघ्या सहा वर्षीय चिमुकल्याने तायक्वोंदो ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त कोरियन लढाऊ कलेमध्ये अपूर्व यश संपादन करत आपल्या कुटुंबासह परिसराचेही नाव उज्ज्वल केले आहे. Taekwon-Do Association of Nanded तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य परीक्षेमध्ये श्रेयशने यश मिळवत 9वा क्यूब (Yellow Belt) प्राप्त केला आहे.

श्रेयश ह्याचा जन्म 11 मे 2019 रोजी झाला असून त्यांनी वयाच्या अगदी लहानशा टप्प्यातच तायक्वोंदोमध्ये निपुणता सिद्ध केली आहे. दिनांक 14 मे 2025 रोजी झालेल्या चाचणीत त्यांना अधिकृत प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. ही परीक्षा मास्टर बालाजी पाटील जोगदंड (5th Dan Black Belt, दक्षिण कोरिया) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Taekwon-Do Association of Nanded ही संस्था Taekwon-Do Association of Maharashtra, World Taekwon-Do Federation, Maharashtra Olympic Association आणि Indian Olympic Association यांच्याशी संलग्न असून भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय व क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे.

 

श्रेयशच्या या यशामुळे त्यांच्या पालकांसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशस्वी कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात तो राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदाने गाजवेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button