तांबुळगाव ते माहुर पायी दिंडीचे ज्ञानोबा हैसाजी पाटील जामगे यांच्या वतीने केले स्वागत !

तांबुळगाव ते माहुर पायी दिंडीचे ज्ञानोबा हैसाजी पाटील जामगे यांच्या वतीने केले स्वागत !
लोहा प्रतिनिधी : तांबुळगाव या गावातून गेले ४५ वर्षापासून अखंडपणे पायी चालत श्रीक्षेत्र माहूर येथे जाण्यासाठी टाळ विना मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत दर वर्षी शिवणी जामगा या गावातुन जाते या वाटेवर ज्ञानोबा हैसाजी पाटील जामगे यांचा आखाडा असुन या आखाड्यावर पायी दिंडीचा विसावा असतो दिडीतील वारकरी यांना चहा पाणी फराळ वाटप करण्यात येतो या वर्षी ज्ञानोबा हैसाजी पाटील यांच्या हस्ते दिंडीतील वारकरी यांना दस्ती टोपी देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी वारकरी महिलांना पिस देऊन सन्मानित करण्यात आले, ४५ वर्षापूर्वी नरहरी श्यामराव उंदरे पाटील यांनी सुरू केलेला पायी दिंडी सोहळा आजतागायत सुरू आहे. आता या दिंडीचे नेतृत्व नरहरी पाटील यांचे पुत्र विठ्ठल पाटील करत आहेत. सदरील पायी वारी माहुर दिंडीचे मुक्काम शेवडी, काळेश्वर, अर्धापूर, बरडशेवाळा, उमरखेड, हिंगणी व माहुरगड असा आहे असे दिंडीतील वारकरी यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, यावेळी जळबाजी जामगे, गजानन भालके, रामदास जामगे, माधव जामगे, रुक्माजी जामगे मोगु जामगे सह गावातील भाविक भक्त याची उपस्थिती होती,