ठिय्या आंदोलन करताच कर्मचाऱ्याची नियुक्ती
ठिय्या आंदोलन करताच कर्मचाऱ्याची नियुक्ती
इरळदचा वीजपुरवठा महिन्यानंतर सुरुळीत होणार
मानवत प्रतिनिधी : गेल्या १ महिन्यापासून कमी दाबाने होणारा तालुक्यातील इरळद गावातील वीजपुरवठा ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात गुरुवारी ता २९ केलेल्या २ तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर सुरुळीत होणार असून विजमंडळाने तात्काळ एक कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे.
तालुक्यातील इरळद येथे गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा सह अन्य कामे ठप्प झाली होती . कमी दाबाच्या वीजपुरवठा होत असल्याने गावातील अनेकांची वीजउपकरणे जळाली होती . या त्रासाला ग्रामस्थ कंटाळून गेले होते . सोमवारी ता २६ ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरुळीत करावा अन्यथा गुरुवारी ता २९ वीजवितरण च्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला होता. परंतु अधिकारी वर्गाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे इरळद येथील संतप्त ग्रामस्थांनी लिंबाजी कचरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ता २९ सकाळी ११ च्या सुमारास येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले . या आंदोलनाची तात्काळ घेत ग्रामीण अभियंता मोहम्मद तल्ला यांनी वीजपुरवठा सुरुळीत करण्याचे आश्वासन देत बी आर कदम या प्रगत तंत्रज्ञ ची नियुक्ती करत असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले . त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात ईरळद चे सरपंच अशोक कचरे, रमेश साठे, संजय देशमुख, शेख गुलाब, संदिप मुळे, प्रभाकर बारहते, पांडुरंग खरात, एकनाथ मोगरे, शेख लालु, सुखदेव मोगरे, नारायण मुळे, एकनाथ बारहते, विठ्ठल मुळे, सचिन खरात, राजेभाऊ मुळे, माऊली मुळे, गंगाधर खरात, वैभव महाजन, नरेश घनसावंत, दादाराव गायकवाड, आबा डोळे, कैलास मुळे, शिवाजी मुळ, दत्ता मुळे, लखन मुळे, बाबाराव आळणे, रामप्रसाद खरात, मदन गायकवाड, रमेश खरात, उत्तम दुधे आदी जण सामील झाले होते.