जिल्हाध्यक्ष रावणगावकर यांची रणनीती ठरतेय प्रभावी

जिल्हाध्यक्ष रावणगावकर यांची रणनीती ठरतेय प्रभावी
****************
भोकर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला आला वेग
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी ) पक्ष कुठलाही असो ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणी करून जनसामान्यांपर्यंत जाऊन पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडावी लागते, भोकर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उभारी घेतलीअसून, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची राजकीय अनुभवी रणनीती प्रभावी ठरत असल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला त्यानंतर पूर्वीचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिले तर काही कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये दाखल झाले विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भोकर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीला वेग आला, राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा भोकर मध्ये झाला त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईमध्ये ही जाऊन अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला आला वेग
*****************
भोकर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वज्रमुठ बांधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करून पक्षाला बळ देण्याचे काम केले दोघांनीही आपल्या राजकीय अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन कार्यकर्त्यांची जोडणी केली त्यामुळेच पक्ष वाढीला वेग आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चांगल्या प्रकारे मजबूत बनत आहे अनेक कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत तालुकास्तरावर आणखी सक्षम नेतृत्व लाभले तर भविष्यात पक्षाला चांगले दिवस येतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो शिवाजी पाटील लगळूदकर, श्रीकांत किन्हाळकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रवेश केल्याने पक्षाचे बळ वाढले आहे माजी नगरसेवक वकील खैराती, जवाजोदिन बरबडेकर, यांच्यासह काँग्रेसचे खाजू इनामदार, अजय टाक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पप्पू अण्णा बोलेवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला यामुळे पक्ष बांधणीला वेग आला आहे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरत असून भविष्यात पक्षाची मजबुती वाढणार आहे.