जिल्हा केमिस्ट संघटनेच्या निवेदनातील चुकीच्या माहितीचा जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशन तर्फे निषेध
जिल्हा केमिस्ट संघटनेच्या निवेदनातील चुकीच्या माहितीचा जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशन तर्फे निषेध
परभणी प्रतिनिधी – परभणी जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनेच्या वतीने अन्न व औषधी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात होमिओपॅथीक डॉक्टर्स बद्दल चुकीची माहिती दिलेल्या प्रकाराचा परभणी जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून यापुढे असे प्रकार झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी ता ५ देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की , जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनेच्या वतीने अन्न व औषधी प्रशासनाला औषधांच्या शेड्युल के अंतर्गत नुकतेच एक निवेदन देण्यात आले होते . या निवेदनात होमिओपॅथीक डॉक्टरांना औलोपॅथिक औषधी वापरण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते. याबाबत काही वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या . या चुकीच्या माहितीमुळे जिल्हाभरातील होमिओपॅथीक डॉक्टर्स संतापले होते . शुक्रवारी ता ६ होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटनेची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली . या बैठकीत जिल्हा केमिस्ट संघटनेच्या दिलेल्या निवेदनातील त्या चुकीच्या माहितीचा तीव्र निषेध करण्यात आला.
तसेच अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की , जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने तथ्य व कायद्याची माहिती न घेता होमिओपॅथीक डॉक्टर्स बाबत चुकीची माहिती निवेदनात दिली आहे . राज्य शासनाने २०१४ पासून होमिओपॅथीक डॉक्टरांसाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांचा सीसीएमपी कोर्स सुरू केला असून तो कोर्स पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथीक डॉक्टरांना औलोपॅथिक औषधी वापराला अधिकृत परवानगी दिली आहे . राज्यभरात १ लाख होमिओपॅथीक डॉक्टर्स ग्रामीण भागासह शहरात देखील अल्पदरात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत . जिल्हा केमिस्ट संघटनेने दिलेल्या निवेदनातील होमिओपॅथीक डॉक्टर्स बद्दल दिलेली माहिती जनतेत संभ्रम निर्माण करणारी आहे . त्यामुळे याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत .
निवेदनावर परभणी जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन कदम , कार्याध्यक्ष डॉ इरफान खान आगाई , सचिव डॉ सुनील जाधव यांचेसह जिल्हाभरातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत .