सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजनासामाजिक कार्य

जागतिक स्तरावरील पेटंट मिळवलेल्या प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांचा उस्माननगर पत्रकार संघाकडून गौरव.

जागतिक स्तरावरील पेटंट मिळवलेल्या प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांचा उस्माननगर पत्रकार संघाकडून गौरव.

उस्माननगर ( गणेश लोखंडे) कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील भूमिपुत्र असलेल्या प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांनी संशोधन क्षेत्रात पेटंट मिळवून गावाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले आहे. सतत अभ्यासात मग्न असलेल्या तुंबरफळे यांनी सर्वांसमोर प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून उस्माननगर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी दि. १४ रोजी साजरी करण्यात आली.
या निमित्त उस्माननगरचे नाव जागतिक स्तरावर गाजवणारे येथील भूमिपुत्र प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांच्या संशोधनाला जागतिक स्तरावर पेटंट मिळाले याबद्दल उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळक यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देवुन यथोचित सन्मान करण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी संयुक्तरीत्या विकसित केलेल्या गॅस सेन्सर संशोधनास जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले. हे संशोधन एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, भविष्यात औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात त्याचा मोठा उपयोग होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेलचे माजी संचालक तथा भौतिकशास्त्र विभागातील प्रा.डॉ. राजाराम माने यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. अनिल मुगुटकर (बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत), प्रा. डॉ. संतोष जाधव, डॉ. श्याम गोरे (डीएसएम महाविद्यालय, जिंतूर), डॉ. विजयकुमार जाधव (शिवाजी कॉलेज, उदगीर), प्रा.डॉ. उमाकांत तुंबरफळे (नांदेड), डॉ. शोएब मोहम्मद शेख (सौदी अरेबिया) आणि प्रा. विजयपाल वाढवे (माहूर) या संशोधकांच्या टीमने संयुक्तरीत्या काम केले आहे.
संभाव्य अपघात टाळता येणार
‘नॅनो’ संमिश्रांपासून तयार केलेल्या या गॅस सेन्सरद्वारे अमोनिया या विषारी वायूची ओळख पटवणे व त्याची तीव्रता मोजणे शक्य होते. औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः खत कारखाने, डंपिंग ग्राउंड, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, सेप्टिक टैंक, सार्वजनिक युरिनल्स अशा ठिकाणी या सेन्सरचा वापर करून भविष्यातील संभाव्य अपघात व जीवितहानी टाळता येईल, असा विश्वास प्रा. डॉ.तुंबरफळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मुळक यांनी ” पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे सल्लागार कलाध्यापक राजीव अंबेकर यांनी तर आभार कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी मानले.
यावेळी उपाध्यक्ष माणिक भिसे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष देवीदास डांगे, विठ्ठल ताटे पाटील, अमजद पठाण सह सुर्यकांत माली पाटील, लक्ष्मण भिसे, सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहूल सोनसळे, पोलीस पाटील विश्वंभर मोरे, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीमाल सोनसळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button