जलपूजनाने जागतिक जलदिन साजरा.

जलपूजनाने जागतिक जलदिन साजरा.
अहमदपुर प्रतिनिधी
अहमदपूर. येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेत जागतिक जलदिन साजरा करण्यात आला .यावेळी कलशामध्ये पाणी घेऊन त्याची पूजा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून पाण्याच्या वापराची प्रतिज्ञा घेण्यात आली .शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड के .आर. यांनी कलशाचे पूजन केले तसेच विज्ञान शिक्षिका बिरादार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व समजावून सांगितले .यावेळी विद्यार्थ्यांना चित्र रंगवण्यासाठी देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलावार एस .पी . यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुलकर्णी मॅडम, बेंबळे मॅडम ,भगत मॅडम ,देशमुख मॅडम, कोतलापुरे सर ,ऊपरवाड सर, पुठ् ठेवाड सर यांनी सहकार्य केले. देशमुख मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले .संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेबजी देशमुख व सचिव अक्षय भैय्या देशमुख यांनी सर्वांचे कौतुक केले.