गुरू वचनावर विश्वास ठेऊन नियमीत अध्ययन केल्यास सहज यश प्राप्ती होते – ह.भ.प. मधूसुदन महाराज कापसीकर
गुरू वचनावर विश्वास ठेऊन नियमीत अध्ययन केल्यास सहज यश प्राप्ती होते – ह.भ.प. मधूसुदन महाराज कापसीकर
उस्माननगर गणेश लोखंडे – “प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असते. गुरू हे आपल्या शिष्याच्या उन्नती साठी सदा सर्वकाळ उपदेश करत असतात. त्यात केवळ आध्यात्मिकच नव्हे तर शिक्षणक्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून हे ज्ञानदानाचे कार्य अनादी काळापासून सतत चालू आहे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्येक शिष्याने गुरूचा सदउपदेश आपल्या दैनंदिन आचरणात आणून गुरूवचनावर दृढ विश्वास ठेवल्यास ज्ञान प्राप्त करून घेऊन आपल्या आयुष्यात सहज यश प्राप्ती करून घेता येते”. असे भावपुर्ण उद्गार येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना ‘गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात मुख्यमार्गदर्शक म्हणून गुरूवर्य ह.भ.प. मधूसुदन महाराज कापसीकर यांनी काढले. व्यासपीठावरील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज व वै. गुरूवर्य ह.भ.प. मामासाहेब मारतळेकर महाराजांच्या प्रतिमांचे पुजन प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संजय पाटील ढेपे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पञकार गणेश ढेपे सह शाळेतील शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते.
मागील सोळा वर्षापासून ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून शाळेतील आपल्या गुरूजनांप्रती कृतज्ञता म्हणून ‘गुरूपोर्णिमा उत्सवाचे’ आयोजन केले जाते. व शाळेतील शिक्षकवृंदासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो.
पुढे विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना ह.भ.प. मधूसुदन महाराज म्हणाले की,” भारतीय संस्कृती मध्ये प्रदिर्घ अशी गुरू परंपरा आहे. गुरूपोर्णिमा ही महर्षी व्यासांचा जन्मोत्सवाचा दिन म्हणून साजरा केला जातो. प्राचिन भारतापासून आज पर्यंतही गुरूचे स्थान हे सदैव उच्च राहिलेले आहे. गुरू हे आपल्या जीवनामध्ये इष्ट बदल घडवून आणतात. आपल्यामध्ये चांगल्या वाईटाची समज निर्माण करून आपल्यासाठी, निकोप समाजाच्या निर्मिती साठी काय योग्य आहे. याचे निवड करण्याचे सामर्थ्य ते आपल्याला प्रदान करतात. त्यासाठी आपले आद्यगुरू माता पिता व शिक्षकांशी प्रामाणिक रहाल तर निश्चितच तुमचे आयुष्य खूप उर्जासंपन्न होईल. असेही ते भाषणाच्या समारोप प्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूपोर्णिमेनिमित्य आपले विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिक्षकांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजीवनी साखरे, शेख आस्मा, सौ. गायकवाड, सिमा जोंधळे, चांगुणा भरकडे, स्वाती कपाळे, प्रिया सामला, कान्होपात्रा तिरमाले, आरती खानसोळे, कौशल्या डापरवाड यांसह विलास गोणारे, सुनिल तारू, आनंद जाधव व छाया कोलते यांनी मार्गदर्शन व मदत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोरी घोगरे ह्या वर्ग ९ वीच्या विद्यार्थीनीने केले. तर आभार चांगुणा भरकडे यांनी मानले.