गुरुगृही गुरूजींचा सपत्नीक गौरव.
गुरुगृही गुरूजींचा सपत्नीक गौरव.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पाडला अनुकरणीय पायंडा.
उस्माननगर ता. कंधार येथे माजी विद्यार्थी जे सेवानिवृत्त झाल्यावर प्राथमिक शिक्षण घेत असताना ज्या तळमळीने शिकवण्यासाठी आगळीवेगळी हातोटी असणाऱ्या गुरुजींनी शिकवलेल्या क्षणांची आठवण ठेवून गुरुजींच्या घरी येऊन त्यांचा सपत्नीक गौरव केला.
विविध क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्याला इंग्रजी भाषेचे सहज सोप्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण देणारे आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे गुरूजी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नलिनीताई या उभयतांचा हृदय स्पर्शी गौरव करण्यात आला.
डॉ. होमी भाभा अणू संशोधन संस्था भोपाळ व मुंबई येथे सेवा करुन सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत पांडे, पशुवैद्यकीय सेवेतून निवृत्त झालेले दिगंबर सूरेवाड, प्रविण पाठक, बालाजी शिंदे यांनी लोखंडे गुरुजींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई देवून गौरव केला. यावेळी लोखंडे यांचे मित्र माजी मुख्याध्यापक किशनराव कराळे यांची उपस्थिती होती.
आठवण करून मुद्दामहून गुरुगृही येवून आदराने गौरव करण्यात आला हे कौतुकास्पद बाब ठरली आहे.