गणेश मंडळे संस्कृती निर्माण करण्याचे केंद्र बनावे- -तहसीलदार घोळवे
गणेश मंडळे संस्कृती निर्माण करण्याचे केंद्र बनावे – तहसीलदार घोळवे
**************
भोकर तालुका प्रतिनिधी गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविता येतात शेतकरी संवाद,युवकांसाठी कार्य,महापुरुषांचे विचार असे उपक्रम राबवून गणेश मंडळे संस्कृती निर्माण करण्याचे केंद्र बनावे असे आवाहन भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले.
भोकर पोलीस स्टेशनच्या वतीने येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने 1 सप्टेंबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृहात शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी येणारे सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावेत असे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे लावता येणार नाही दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल सर्व मंडळांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले,शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतूक विस्कळीत झाली,रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत,पावसाचे पाणी रस्त्यातच साचते विजेचा लपंडावन चालू असतो, अवैध दारू विक्रीवर आळा घालावा अशा सूचना सदस्यांनी मांडल्या भोकर शहरात सामाजिक एकता चांगली आहे असे मनोगत गोविंद बाबा गौड,नागनाथराव घिसेवाड,शिवाजी पाटील किन्हाळकर,पत्रकार एल.ए.हिरे, बी.आर.पांचाळ, अहमद करखेलीकर यांनी व्यक्त केले या बैठकीस महावितरणचे उपअभियंता आचार्य, नगरपालिकेचे जावेद इनामदार, डॉ.उत्तम जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोहेका आरेवार,गाडेकर,यांच्यासह सर्व सदस्य,पत्रकार पोलीस पाटील उपस्थित होते