सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताशेती विषयी

कोंबड्या वाहतुक करणार्या पिकअपचा अपघात

कोंबड्या वाहतुक करणार्या पिकअपचा अपघात

वसमत प्रतिनिधी : वसमत तालुक्यातील आसेगाव जवळ पिक अप व बैलगाडीचा भिषण अपघात झाला असुन यामध्ये कोंबड्या सुखरुप तर बैल व बैलगाडी चालकाचा मृत्यू झाला आहे व इतर दोन जण जखमी झाले आहेत.या बाबत माहिती अशी की आसेगाव येथील चतुरमुखी विद्यालय येथील सेवक पंडितराव भाऊराव मुळे वय 50 वर्षे हे आज सुट्टी निमित्त शेतातून चारा आणण्यासाठी जात असताना कोंबड्या घेऊन भरधाव वेगाने जाणारा पिक अप क्र. एम एच २६ एच १६५४ या पिकअपने बैलगाडीला जोरदार धडक दिली यात पंडितराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीचा बैल सुध्दा दगावला आहे.याच अपघातात पंडितराव मुळे यांच्या सोबत असलेले बळीराम हिरामन गच्चे वय ५०, विकास पंडीत मुळे वय 30 हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन चे सपोनी गजानन बोराटे ,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, पोलीस कर्मचारी साहेब चव्हाण, आडे, विभुते सह पोलीस कर्मचारी दाखल झाले. व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताने आसेगाव नांदेड रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .यावेळेस ग्रामीण पोलीसानी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरूळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button