केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांची बिलोली येथे बदली
केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांची बिलोली येथे बदली
पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ संपन्न
उस्माननगर ( गणेश लोखंडे) शिराढोण ( ता.कंधार) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंतराव काळे गुरूजी यांची बिलोली येथे बदली झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ सोहळ्याचे शनिवारी दि.६ रोजी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाठ ( खु.) जिल्हा परिषद शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.गादेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांची उपस्थिती होती.
उस्माननगर केंद्रातील शिस्त प्रिय , उपक्रमशील , विविध स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तळमळीने तात्परतेने प्रयत्न करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा केंद्रप्रमुख आणि केंद्रातील शिक्षकांचे, मित्रांचे आवडते श्री.जयवंतराव काळे यांची प्रदीर्घ सेवा करून त्यांची जिल्हा परिषद नांदेड विभागाने बिलोली येथे पुन्हा केंद्रप्रमुख म्हणून बदली केली आहे. उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात त्यांचा निरोप समारंभ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सुर्यकांत मालीपाटील, मुख्याध्यापक राहुल सोनसळे, यांनी काळे यांच्या काम करण्याची तळमळ, विद्यार्थ्यांसाठी असलेली धडपड व शैक्षणिक कार्याचा गौरव केला. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी आपल्या मनोगतात ” दैववादी होण्यापेक्षा कर्मवादी राहून प्रामाणिक सेवा केल्यास निश्चित समाधान मिळते ” विविध प्रकारच्या पुरस्काराने कामे करण्यास प्रोत्साहन मिळते.आपली जबाबदारी सुद्धा अनेकपटींनी वाढते. प्रामाणिकपणा,कामाबद्दल उत्साह, असेल तर चांगल्या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य निश्चित मिळते.” असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष माणिक भिसे ,सचिव प्रदीप देशमुख ,सुर्यकांत मालीपाटील, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विठ्ठल ताटे पाटील ,लक्ष्मण भिसे, चौधरी, आदींची उपस्थिती होती.