Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ता
कार च्या धडकेत एकाचा मृत्यू
कार च्या धडकेत एकाचा मृत्यू
मानवत रिंग रोडवर झाला अपघात
मानवत प्रतिनिधी – मानवत शहरातील बायपास राष्ट्रीय महामार्ग भगतसिंग कॉलोनी जवळ असलेल्या पुलाजवळ भीषण अपघात MH 16 BC 1933 स्विप्ट कार गजानन महाराज मंदिर रा कडून येणारी भरघाव येणारी कार च्या धडकेत एक ट्रक ड्रायवर शे.शकिल पी मोहिमोद्दीन वय 62 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.
सदरील हा ड्रायवर खामगाव जिल्हा बुलढाणा येथील आहे हा आपली गाडी भरण्यासाठी राघवेंद्र जिनिंग येथे आला असता गाडी भरण्यास वेळ लागत असता तो आणी त्याचा मित्र नास्ता करण्यास बाहेरील हॉटेल वर गेले असता वापस येणांना भगतसिंग कॉलोनी जवळ असलेला पुला जवळ आले असता समोरून येणारी भरघावं वेगाने येणारी स्विप्ट गाडीचा ताबा सुटल्याने गाडी अंगावर आली ड्रायवरच्या आतील भागात जब्बरी मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.