सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ संपन्न

कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ संपन्न

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त व्हिजन मनी मंत्रा यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. हा कार्यक्रम दिनांक ११ मार्च रोजी रोटरी सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमात सौ. रोहिणी अमोल पराडकर यांचा त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष मा. सौ. अरुंधती महाडिक तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कविता शाह उपस्थित होत्या.

या वेळी सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, “महिलांनी तणावमुक्त जीवन जगावे, जेणेकरून त्या कुटुंबाच्या तसेच स्वतःच्या आर्थिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतील. महिलांनी आर्थिक नियोजन आणि साक्षरतेकडे विशेष लक्ष द्यावे, ज्यामध्ये व्हिजन मनी मंत्रा प्रभावी मार्गदर्शन करीत आहे.”

व्हिजन मनी मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. या निमित्ताने सी.ए. अमित शहा यांनी उपस्थित महिलांना सुरक्षित गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ. रोहिणी पराडकर यांच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button