कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
लोहा कंधार,(प्रतिनिधी) कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती निमित्त तसेच खालील मान्यवरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मा.ना.संजय बनसोडे क्रीडा व युवक कल्याणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.आ.विक्रम काळे विधान परिषद आमदार महाराष्ट्र मा.सुरजजी चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून निसर्ग सेवा गटाचे फांउन्डर शिवसांब घोडके यांच्या सहकार्यातून त्यांच्याच मार्गदर्शन पूर्वक पंचविस व्या वर्धापण दिना निमित्त पंचवीस पारीजातकचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदरील कार्यक्रम राष्टकूट कालीन आठव्या शतकातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोसी येथे निसर्ग सेवा गट पानभोसीच्या निसर्ग सेवा कर्म भूमी मधे महत्वपुर्ण स्वर्ग फुलवर्गीय पारिजातक वृक्ष रोपांची २५ वृक्ष रोप व नारळ यांची ३ रोपे लागवड करून केक वगैरे इतर अनाठायी खर्च न करता मोठ्या हर्षोल्हासात विविध मान्यवारांच्या शुभ हस्ते लागवड करण्यात आली.
यावेळी दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी बरबडेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,संभाजीराव मुकनर युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नांदेड,मनोहरराव विश्वनाथराव भोसीकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कंधार,सौ.राजश्रीताई मनोहरराव भोसीकर सरपंच पानभोसी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड,छत्रपती स्वामी महाराज तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लोहा,राम पाटील पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष लोहा,सुभाषराव राहेरकर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कंधार,गणेश ठेवरे काँग्रेस तालुका युवक काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष कंधार, चंपतराव बोडके ओबीसी शहर अध्यक्ष लोहा,राजेश्वर गोंड बुध प्रमुख भाजपा तथा शक्ती केंद्र प्रमुख पानभोसी, सौ.मंगलताई गोंड,ग्रा.पं.सदस्य पानभोसी,लुकमन शेख कंधार,निळकंठराव डोम,ग्राम पंचायत कर्माचारी पानभोसी,बळीराम शिंदे, मंगलसांगवीकर,विठ्ठलराव भुजबळ (पुजारी) धानोरा (शे),रोहिदासराव घोडके,साहेबराव सोमासे फुलवळकर,मनसुर शेख आदी निसर्ग प्रेमी, बालक, बालिका पर्यटक, रक्षक,स्नेही, मान्यवरां तसेच निसर्ग सेवक बळवंत दत्तात्रय भोसीकर गुरुजी,शिवराज संभाजीराव गोंड,तंटा मुक्ती अध्यक्ष पानभोसी आदी निसर्ग प्रेमी, निसर्ग सेवक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना दिलीपराव धर्माधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे कंधार तालुकाअध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर यांनी केले तर प्रा.बळवंत पाटील भोसीकर यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.