ऋतिक बंडेवार यांनी पटकाविले सुवर्णपदक,सोनखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
ऋतिक बंडेवार यांनी पटकाविले सुवर्णपदक,सोनखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
*************
लोहा प्रतिनिधी – नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती श्रीनिवास बंडेवार यांचा मुलगा ऋतिक श्रीनिवास बंडेवार यानी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून लोहा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळविला आहे.सोनखेड येथील रहिवासी असलेले ऋतिक श्रीनिवास बंडेवार वय-२२ वर्षे यांची लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीकडे सततची धाव असल्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये शैक्षणिक पदवी पूर्ण करीत खेळावर पण लक्ष केंद्रित केले होते प्रथम त्यांनी जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविले होते. त्यानंतर काल गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या खेळाडूचा पराभव करून महाराष्ट्राचे नेतृत्व करत ऋतिक श्रीनिवास बंडेवार यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्यासह सोनखेड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.