उदगीरच्या सुपुत्राचा घवघवीत यश! UPSC मध्ये 197वा क्रमांक मिळवणाऱ्या श्री. कृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांचे जंगी स्वागत

उदगीरच्या सुपुत्राचा घवघवीत यश! UPSC मध्ये 197वा क्रमांक मिळवणाऱ्या श्री. कृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांचे जंगी स्वागत
उदगीर | सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, उदगीर आणि उदयभाऊ मुंडकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे श्री. कृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. त्यांनी UPSC परीक्षेमध्ये देशभरातून 197वा क्रमांक पटकावत उदगीर आणि कोडळी गावाचे नाव उज्वल केले आहे.
या विशेष क्षणाचे औचित्य साधून समस्त मित्र परिवार व शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी शहरात उत्साहाचे वातावरण होते. हा क्षण संपूर्ण उदगीरकरांसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायक ठरला.
या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला लाभली मोठी सज्जता या स्वागत समारंभास प्रमुख उपस्थितीत उदयसिंह मुंडकर, बीपीन जयवंतराव पाटील, धनाजी मुळे, शामभाऊ डावळे, प्रशांत जगताप, बाळासाहेब पाटोदे, चंदू खटके, धोंडराम पाटील, भरत चामले, धनराज बिरादार, नवनाथ खुळे, दत्ता पाटील, संदीप पाटील, संजय खुळे, रामेश्वर बिरादार, शिंदे साहेब, दिनकर बिरादार, सतीश पाटील मानकीकर, नारायण पाटील, अशोक कांबळे, राहुल बिरादार, अंकुश ताटपले, निवृत्ती तिरकुमठे, शिवशंकर पाटील, राहुल पाटील, सचिन पाटील, प्रतीक शिंदे, सुमित पाटील, प्रसाद शिंदे, निखील मुसळे, अंकुश बामणे, गणेश बिरादार मांजरी, मनोज पाटील, लहू कांबळे, भानुदास कबनूरे, राम पाटील (सुमठाणा), भाऊसाहेब जांभळे, संदीप पाटील (कासराल), भगवान पाटील (कोदळी), पुंडलिक वाकडे, पी. एम. पाटील, अजय चाकुरे, वैभव बिरादार, दत्ता बामणे, वैभव रेड्डी, बबलू घोणसीकर, सुभाष सोमवशी यांसह असंख्य मित्र-मैत्रिणी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.