सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना

उदगीर पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक 2026

11.30 वाजेपर्यंत 17.78 टक्के मतदान

उदगीर पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक 2026

11.30 वाजेपर्यंत 17.78 टक्के मतदान

उदगीर प्रतिनिधी —जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत उदगीर पंचायत समिती मतदारसंघात आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू असून जसजसा वेळ पुढे सरकत आहे, तसतसा मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे.

निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 17.78 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. यामध्ये पुरुष मतदारांचे मतदान प्रमाण 20.72 टक्के तर महिला मतदारांचे मतदान 14.59 टक्के आहे. इतर प्रवर्गात अद्याप मतदान नोंदले गेलेले नाही.

सकाळी 9.30 वाजेपर्यंत 5.49 टक्के मतदान झाले होते, त्यानंतर पुढील दोन तासांत मतदानाचा वेग लक्षणीय वाढल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढू लागली असून दुपारच्या सत्रात आणखी चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्व मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. प्रत्येक दोन तासांनी मतदानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, उर्वरित मतदारांनीही निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button