उदगीर तालुक्यात पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना
उदगीर तालुक्यातील मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना

उदगीर तालुक्यात पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना

उदगीर तालुक्यातील मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना
शांततापूर्ण मतदानासाठी उदगीर प्रशासन सज्ज
उदगीर प्रतिनिधी : मनोज जगळपूरे
आज गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदगीर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेली मतदान पथके नियोजित वेळेत आपल्या-आपल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाली.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य, ईव्हीएम यंत्रणा, मतदार यादी तसेच सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
उदगीर तालुक्यात एकूण २०४ मतदान केंद्रे असून, ७३ वाहनांच्या माध्यमातून ईव्हीएम यंत्रणा व मतदान साहित्य सुरक्षितपणे संबंधित मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. मतदान पथकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचले असून मतदान प्रक्रिया नियोजनानुसार पार पडणार आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही माहिती निवडणूक अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली.














































