उदगिरात डेअरी बचाव पुनरुज्जीवन समितीचे धरणे आंदोलन दूध योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी.
उदगिरात डेअरी बचाव पुनरुज्जीवन समितीचे धरणे आंदोलन दूध योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी.
उदगीर–येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात यावे व यानंतरच या प्रकल्पातील भंगाराचा लिलाव करण्यात यावा.या मागणीसाठी येथील दूध योजना पुनरुज्जीवन समितीच्या वतीने गुरुवारी डेअरी समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कृती समितीचे आशिष पाटील राजूरकर, अजित शिंदे, नरेश सोनवणे, अहमद सरवर, मोतीलाल डोईजोडे, प्रा. एस. एस. पाटील, संतोष कुलकर्णी, चंद्रकांत टेंगेटोल, ओम गांजूरे या समिती सदस्यांसह माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, रंगा राचुरे,भरत चामले, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मनोज पुदाले, ऍड. दत्ता पाटील, मनसे चे संजय राठोड, अजीम दायमी, गजानन सताळकर, सेनेच्या अरुणा लेंडाणे, विवेक जाधव, मंजूर खान पठाण, स्वप्नील जाधव, सुरेश पाटील नेत्रगावकर,प्रमोद पाटील यांच्यासह डेअरी पुनरुज्जीवन समितीस पाठिंबा देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते. दूध डेअरी पूर्ववत सुरू झाल्याशिवाय या डेअरीतील शिल्लक असलेल्या मशिनरीचा एक नट बोल्टही हलवू देणार नसल्याचा पवित्रा या समितीने घेतला. आभार प्रदर्शन कपील शेटकार यांनी केले.