इरळदचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा
इरळदचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा
मानवत प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील इरळद या गावात गेल्या कित्येक दिवसापासून होणारा कमी दाबाचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याप्रश्नी गुरुवारी ता २९ विजमंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे .
येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना ग्रामस्थांनी सोमवारी ता २६ निवेदन दिले आहे . त्यात म्हटले आहे की , इरळद गावात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे . कमीदाबामुळे अनेक जणांनी विजेचे उपकरणे जळाली आहेत . वीजवीतरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावातील वीजपुरवठा योग्य दाबाने सुरळीत सुरू करावा , अन्यथा याप्रश्नी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल .
निवेदनावर लिंबाजी कचरे , रमेश साठे , बाबाराव आळणे , प्रभाकर बारहाते , एकनाथ मोगरे , विष्णू खरात , भगवान बारहाते , रामकीशन मोगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .