सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासामाजिक कार्य

इंदिरा गांधी सिडको सेंटरवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत

इंदिरा गांधी सिडको सेंटरवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत

नांदेड प्रतिनिधी : इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड येथे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे परीक्षा केंद्र होते. पाचवीच्या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक बकवाड सर व आठवीच्या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक नागनाथ बडूरे सर यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे परीक्षा केंद्रात स्वागत केले.
दोन्हीही केंद्रप्रमुखाच्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी आनंदी झाले व त्यांना प्रोत्साहन मिळाले.
पाचवीच्या केंद्रात पर्यवेक्षक म्हणून श्री सज्जन सर,श्री ताटे सर, मुंगल मॅडम, श्री नरवाडे सर,खंदारे मॅडम यांनी उत्कृष्ट काम केले.
आठवीच्या पर्यवेक्षणाचे काम श्री एम. टी. कदम सर, बामणे सर, चिलकेवार, मॅडम, साखरे सर, पडोळे मॅडम, नल्लेवार मॅडम, योगेश पाटील सर, श्री आर.बी.पवार सर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्री गंगातीरे व डी. आर. पवार यांनी योगदान दिले.
सर्वांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती परीक्षा व्यवस्थित पार पडली.
सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button