Homeआपला महाराष्ट्रक्रीडाग्रामीण वार्तासरकारी योजना
आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धात ऋतिक बंडेवारची निवड….!
आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धात ऋतिक बंडेवारची निवड….!
लोहा,(प्रतिनिधी) कंबोडिया देशात दि.७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी किंग बौक्सिग स्पोर्ट असोसिएशन च्या कार्याध्यक्षा दीपा गवळी यांच्या बरोबरीनच त्यांचे विद्यार्थी ऋतिक बंडेवार सह कार्तिक राठोड यांचीही किंग बौक्सिग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे देशभरातून ३९ खेळाडूंची निवड झाली असून त्यात नांदेड जिल्ह्यातून ऋतिक बंडेवार सह ३ खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.या खेळाडूंना ब्लेझ कौम्बैट ऐंड फिटनेस क्लब चे संचालक किरण गवळे यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण देवून मोलाचं मार्गदर्शन केले.या खेळाडूंच्या निवडीबद्दल पालकमंत्री गिरीष महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार अजित गोपचडे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी सभापती श्रीनिवास बंडेवार यांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.