आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ताराजकारणशेती विषयीसरकारी योजनासामाजिक कार्य

आशिया खंडापर्यंत पोहोचलेल्या दूध भुकटीची दृस्ट लागली : उदगीरकरांना पश्चिम महाराष्ट्रातील पिशवी बंद दुधाचा आधार

आशिया खंडापर्यंत पोहोचलेल्या दूध भुकटीची दृस्ट लागली : उदगीरकरांना पश्चिम महाराष्ट्रातील पिशवी बंद दुधाचा आधार

उदगीर — एकेकाळी येथे शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहचून उदगीरची ओळख या भुकटीनेजगाच्या नकाशावर नेवून पोहचलेली असताना त्याला दृस्ट लागल्याने आता उदगीरकरांना पश्चिम महाराष्ट्रातील पिशवी बंद दुधाची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे.
राजकारण्यांचे दुर्लक्ष, प्रशासकीय अनास्था, यंत्रणेची उदासिनता यातूनही मार्ग काढत उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाचे दोन वेळा पुनरुज्जीवन झाले खरे पण नंतर शासनाने याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने आज या दूध भुकटी प्रकल्पात भुकटी ऐवजी केवळ अंगाराच उरलेला आहे. आता हा उरलेला अंगारा लिलावात निघाला असून त्याची किंमत १ कोटी १० लाख इतकी ठरली आहे .

अनेक वर्षांनंतर मराठवाड्याकडे दुग्ध विकास खात्याचे मंत्रीपद आलेले असताना या प्रकल्पाचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारी यंत्रणेने त्याही अपेक्षावर पाणी फेरले.

उदगीर येथे १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री के शंकरराव चव्हाण बाच्या हस्ते सुरू झालेल्या येथील दूध भुकटी प्रकल्प २५ वर्षे सुरू होता ५५० कर्मचाऱ्यांना थेट रोजगार व याहून अधिक हजारो हातांना रोजगार देण्याचे काम या तालुक्यात व परिसरात या नावारूपाला आलेल्या धवल क्रांतीने केले होते. मात्र दुधावरची
मलाई खाऊन स्वतःचे चांगभल करणाऱ्या वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी या शासकीय योजनेचा अक्षरशः भुगा करून टाकला शिवाय, जागतिकीकरणाच्या वाऱ्यात शासकीय योजना मोडीत काढण्याच्या प्रयत्नात ही दूध भुकटी योजना बळी ठरली. २३ जून २००२ पासून हा प्रकल्प कायमचा बंद पडला. हा बंद पडलेला प्रकल्प चालू होण्याची कोणतीच चिनो नसताना उदगीरचे तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी पुढाकार घेऊन २५०.८३ लाख रुपये शासनाकडून मंजू करून घेतले तत्कालीन दुग्ध विकासमंत्री व राज्यमंत्र्यांनी या दूध भुकटी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केल्यानंतर या मंजूर निधीतून प्रकल्पाच्या पुनरूत्योवनाचे काम सुरू झाले. त्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू झाला. पण पुनरु जीवनानंतर अवध्या एका महिन्यात या दूध भुकटी प्रकल्पाने अखेरचा श्वास सोडला. नंतर येथील प्रशासकीय यंत्रणेकडून हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र ‘एअर हिटर’ च्या विधाडाचे कारण पुढे करून हा प्रकल्प आता कायमचा बंद पडला आहे. आता प्रकल्प पुन्हा सुरू होईल की नाही, याबद्दल सर्वांनाच शंका आहेउदगीर येथे १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते सुरू झालेल्या येथील दूध भुकटी प्रकल्प २५ वर्षे सुरू होता .५५० कर्मचाऱ्यांना थेट रोजगार व याहून अधिक हजारो हातांना रोजगार देण्याचे काम या तालुक्यात व परिसरात या नावारूपाला आलेल्या धवल क्रांतीने केले होते. मात्र दुधावरची
मलाई खाऊन स्वतःचे चांगभल करणाऱ्या वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी या शासकीय योजनेचा अक्षरशः भुगा करून टाकला शिवाय, जागतिकीकरणाच्या वाऱ्यात शासकीय योजना मोडीत काढण्याच्या प्रयत्नात ही दूध भुकटी योजना बळी ठरली. २३ जून २००२ पासून हा प्रकल्प कायमचा बंद पडला. हा बंद पडलेला प्रकल्प चालू होण्याची कोणतीच चिन्हे नसताना उदगीरचे तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी पुढाकार घेऊन २५०.८३ लाख रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले. तत्कालीन दुग्ध विकासमंत्री व राज्यमंत्र्यांनी या दूध भुकटी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केल्यानंतर या मंजूर निधीतून प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले. त्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू झाला. पण पुनरुज्जीवनानंतर अवघ्या एका महिन्यात या दूध भुकटी प्रकल्पाने अखेरचा श्वास सोडला. नंतर येथील प्रशासकीय यंत्रणेकडून हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र ‘एअर हिटर’ च्या बिघाडाचे कारण पुढे करून हा प्रकल्प आता कायमचा बंद पडला आहे.

पुनरुज्जीवन समिती स्थापन –!

हा बंद पडलेला प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी पुनरुज्जीवन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने घेतलेल्या बैठकीत राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी या समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय त्यांनी या समितीस राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रधान सचिव यांची भेट घालून नवी दिल्ली येथील एन .डी. डि. बी . च्या नावे पत्रही मिळवून दिले. या समितीने तत्कालीन खा. सुधाकर शृंगारे यांना सोबत घेऊन केंद्रीय दुग्ध विकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना उदगीर येथे आणून या सद्य स्थितीत असलेल्या दूध डेअरीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ही डेअरी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र उदगिरचे मंत्री कॅबिनेट मध्ये असताना त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी डावलण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button