आर्य वैश्य समाज बांधव व महिला भगिनींनी केले वृक्षारोपण
आर्य वैश्य समाज बांधव व महिला भगिनींनी केले वृक्षारोपण
वसमत. प्रतिनिधी. – महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आर्य वैश्य समाज भुषण, महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करुन सुधीरभाऊंचा वाढदिवस संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. यानिमित्त सार्वजनिक वाचनालय, वसमत येथे आर्य वैश्य समाज बांधव व महिला भगिनी तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लिंब, पिंपळ, बांबु, करंज आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी महिला भगिनींनी सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली. वाचनालयाचे कामकाज कसे चालते याची माहिती व्यवस्थापक श्री दिलीप माळवटकर यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमासाठी आर्य वैश्य समाज वसमतचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कोसलगे, कोषाध्यक्ष श्री सुमीत दलाल, श्री प्रशांत कोसलगे, महासभेच्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष सौ. रुपाली दलाल यांच्या सह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते