सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा ऊस शेतीमध्ये उपयोग

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा ऊस शेतीमध्ये उपयोग

वसमत …… प्रतिनिधी……

पारंपरिक प्रचलित पद्धती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा उपयुक्त ठरतो या विषयावरील सखोल संशोधनातून ए आय हा अतिशय उपयुक्त पर्याय ऊस शेतीसाठी निवडता येईल असे मत आर्या सुनील नायक हिने मांडले.
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी कुमारी आर्य सुनील नायक या विद्यार्थीनिने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सक्षम ऊस शेती या विषयावर प्रकल्प सादरीकरण केले.
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी कुमारी आर्या सुनील नायक हिची नुकतीच होमी भाभा स्पर्धा परीक्षेसाठी वरिष्ठ पातळीवर निवड झाली असून तिने विद्यालयातील सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या समोर कृती संशोधन सादर केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून ऊस शेती कशी करावी या पद्धतीत लागणारा खर्च होणारी उत्पादनात वाढ, पाण्याची बचत याबाबतची सर्व माहिती तिने दिली. त्याचबरोबर आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स द्वारे शेतात जमिनीची आर्द्रता, माती परीक्षण, वातावरणातील बदल,खताची मात्रा, सॅटलाईट द्वारे क्रॉप्स ट्रेस मॅप,NDVI, EVI, इत्यादी या सर्वांची माहिती आर्या नायक हिने विद्यार्थ्यांना दिली. नवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करून तिच्या संशोधनाचे महत्त्व पटवून दिले. तिला शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. आर्किलवाड सर यांनी मार्गदर्शन केले. आर्या सुनील नायक हिचे शाळेचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर, संस्थेचे सचिव मा.श्री. पंडितराव देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण शेळके, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button