आनंददायी शिक्षण या उपक्रम अंतर्गत नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास नगर परिषद कामकाजाचे शिकवले धडे…
आनंददायी शिक्षण या उपक्रम अंतर्गत नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास नगर परिषद कामकाजाचे शिकवले धडे…
मानवत प्रतिनिधी : आनंददायी शिक्षण या उपक्रम अंतर्गत नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाज कळावे या हेतूने पर्यवेक्षक संजय लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शनीवारी ता 14 भेट देण्यात आली.
यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक कोमल सावरे यांनी नगर परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
वेगवेगळ्या विभागातील माहिती देताना स्वच्छता विभाग जन्म मृत्यूच्या नोंद विभाग बांधकाम विभाग मालमत्ता हस्तांतर विभाग. ओला कचरा सुका कचरा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी पत्रकार सत्यशील धबडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कचरा व्यवस्थापनास विद्यार्थ्यांनी भेट द्यावी अशी विनंती शाळेकडे केली असून निश्चितच आगामी काळात विद्यार्थ्यांना घनकचरा डेपो दाखवण्यात येणार आहे. यावेळी वेगवेगळ्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे दिली आहे. यावेळी बांधकाम विभागाची इंजिनियर संबंधित आस्थापनाची कर्मचारी उपस्थित होते. सदाशिव होगे. धनंजय गरुड सखाराम काचगुंडे अश्विनी मुळे मॅडम सुचिता कल्याणकर उपस्थित होते. शेवटी आभार पर्यवेक्षक संजय लाड यांनी मानले.