आगामी विधानसभेच्या निमित्ताने बुथनीहाय बांधणी करिता पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – राज्य उपाध्यक्ष अॅड.गोविंद दळवी
आगामी विधानसभेच्या निमित्ताने बुथनीहाय बांधणी करिता पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – राज्य उपाध्यक्ष अॅड.गोविंद दळवी
गंगाखेड येथे आढावा बैठक संपन्न…
(गंगाखेड प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणा बरोबरच इतरही आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने उभी केली त्यामुळे मान्य. बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी काम केले पाहिजे. आगामी विधानसभेच्या निमित्ताने ओ बी सी.सह इतर प्रवर्गाचे मिळुन 100 आमदार निवडून आणावयाचे आहेत. त्याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करत बूथनिहाय कार्यकर्ते जोडले पाहिजे असे प्रतिपादन परभणी जिल्ह्य बहुजन वंचित आघाडीचे निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष मा. अॅड.गोविंद दळवी यांनी 15 रोजी परळी रोड, ओमसाई मंगल कार्यालय गंगाखेड येथे आयोजित कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, जि.प.सदस्य भगवान सानप, महिला जिल्हाध्यक्ष सुनिताताई साळवे, वंचित बहुजन आघाडी लातूरचे निरीक्षक सिद्धोधन सावंत, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, जिल्हा महासचिव दिलीप मोरे, इत्यादींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी…