अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या जंगी स्वागतासाठी लोहा कंधार मतदार संघातील ओ बी सी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे — मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी
अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या जंगी स्वागतासाठी लोहा कंधार मतदार संघातील ओ बी सी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे — मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी
———————–
लोहा / प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा दि.२ आॅगसट २०२४ रोजी माळेगाव – माळाकोळी व्हाया लोहा मार्ग नांदेड येथे नवा मोंढा मैदानाकडे रवाना होणार आहे.
तेव्हा या सदरील ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे लोहा शहरात दि.२ आॅगस्ट रोजी सकाळी 12.30 वाजता क्रांतिसूर्य बुद्धंविहारासमोरील सुर्यवंशी काॅम्पलेक्स येथे आगमन होनार आहे या यात्रेचे स्वागत लोहा नगरीचे लोकनियुक्त मा. नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे मोठा पुष्पहार घालून फेटा बांधून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व लोहा कंधार तालुक्यातील ओ बी सी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोहा न.पा.चे लोकनियुक्त मा.नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी केले आहे.