सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडा

अनिकेत कल्याणकर यांना एम.एस.मेकॅनिकल पदवी प्रदान

अनिकेत कल्याणकर यांना एम.एस.मेकॅनिकल पदवी प्रदान

वसमत प्रतिनिधी. येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा अनिल नारायण कल्याणकर यांचे सुपुत्र अनिकेत अनिल कल्याणकर यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, डिअर बॉर्न, यु एस ए येथून इंडस्ट्रियल अँड सिस्टीम इंजिनिअरिंग या विषयात एम.एस. पूर्ण केले. काल या विद्यापीठात झालेल्या एका शानदार समारंभात अनिकेत कल्याणकर यांना ही पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.
अनिकेत यांनी बी. टेक. मेकॅनिकल,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथून विशेष प्राविण्याने पूर्ण केले. त्यांनी जी. आर. इ. परीक्षा उत्तीर्ण करून यू. एस. ए. सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त केली. सध्या ते अमेरिकेत टेक्सास प्रांतात ह्यूस्टन येथे पेट्रोलियम ॲनालायझर कंपनी मध्ये मनुफॅक्चरिंग अभियंता म्हणून संशोधन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, संस्थेचे सचिव मा . आ पंडितराव देशमुख साहेब , उपाध्यक्ष मुंजाजीराव जाधव साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मा मा जाधव , महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजोबा सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नारायणराव कल्याणकर , आई वडील यांनी अभिनंदन केले आहे. इंजि .अनिकेतच्या उत्तुंग यशाबद्दल या भूमिपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button